अन्य समाजाबद्दल सद्भाव बाळगणारा मध्यमवर्ग आता समाजात ‘फूट’ पाडण्याच्या, इतिहासाची ‘मोडतोड’ करण्याच्या आणि ‘खोटं’ बोलण्याच्या राष्ट्रकार्यात मग्न होऊन गेला आहे…
२०११मध्ये अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात हिरिरीने भाग घेणारा मध्यमवर्ग २०१४नंतर कान, डोळे आणि तोंड बंद करून बसला आहे. त्याला देशातला भ्रष्टाचार, त्यांच्या लाडक्या पक्षाने अन्य पक्षांतल्या भ्रष्टाचारी नेत्यांना आपलंसं करून घेणंही दिसत नाही. महिला, दलित, अल्पसंख्य यांना विषमतेची वागणूक मिळत आहे. हा आक्रोश मध्यमवर्गाच्या कानावरदेखील पडत नाही.......